कसे जगावे
आयुष्याची परवड झाली..कसा असा हा दुरावा
क्षण एकेक असा वाटतो..पाखरू होवून उडावा
क्षण एकेक असा वाटतो..पाखरू होवून उडावा
वचनांचे हे देणे सारे..कसला द्यावा पुरावा
कुसुमांचे ते गीत होवुनी ..गंध होऊन उरावा
कुसुमांचे ते गीत होवुनी ..गंध होऊन उरावा
बाग गंधाळला बघ सारा ..कोण तुला दिसावा
दिसू आम्ही सारे वाईट..चागला कोण असावा ?
दिसू आम्ही सारे वाईट..चागला कोण असावा ?
हाता मध्ये हात आपुला.. मुक्काम कोठे ठेवावा
बदनाम आहे दुनिया सारी ..विश्वास कोठे ठेवावा ?
बदनाम आहे दुनिया सारी ..विश्वास कोठे ठेवावा ?
बांधल्या गेल्या भिंती साऱ्या ..केला आता गिलावा
कडाडती काफिर हे ढग .. नसता काही ओलावा !!
कडाडती काफिर हे ढग .. नसता काही ओलावा !!
© राम मोरे/१५१२२०१२

No comments:
Post a Comment