Wednesday, December 30, 2015

जगण्याचे कारण

प्रेम म्हणजे रोजचेच असते मरण....
पण क्षणभर जगण्याला पुरते तेच कारण....
©रामास्वामी /२४१२२०१५००४२

रिकाम्या जागा

रिकाम्या जागा विसरायच्या असतात..
भरलेले सारे आपलेच असते ,
भ्रम असे मनी ठेवायचे नसतात....
©राम मोरे/२३१२२०१५२११०

आयुष्य

तिरडिवर जाणे तर ठरलेच रे होते
पण आयुष्य कळण्यात सारा जन्म गेला..
©राम मोरे/२४१२२०१५११३२

देह सोहळा

स्पर्शुन घे मुक्या जखमानां...
घाव ते ताजे करुन जा...
ओठात तुझ्या घुमतो मारवा...
देह सोहळ्याचे क्षण ते...
आज ताजे करुन जा...
©रामास्वामी/२५१२२०१५०८४० — remembering all the happy times we had together at Hotel Taj Nasik.

मी तोच होतो



देव अनाथ जन्मला जेथे
ते गाव माझेच होते
भळभळून जन्मल्या जेथे यातना
ते घाव माझेच होते !!
कापून गाळे त्या गरीबांचे
ज्यांनी ते पोट भरले
रक्तात माखलेले
ते हात त्यांचेच होते !!
हजारोंची ज्यांनी पापे धुतली
ते हात माझेच होते
मग हातात खिळे ठोकणारे
ते हात कुणाचे होते ?
दुनियेत जे बदनाम झाले
ते नाव माझेच होते
शेंदूर फासून सोने झाले
ते देव कुणाचे होते ?
@राम मोरे /३००१२०११३१८१७

दिया

पहले तो इन्तजार मे दिया जलाकर बैठते थे ....
आजकल हमे जलाकर उजियारा कर लेते है ....
©राम मोरे/२६१२२०१५१८५३

जिंदगी या महबुबा

जिन्दगी जब दुर होती है..!!
बहुतही याद आती है..!!
जैसे कि महबुब अपनी होति है...
©राम मोरे/२७१२२०१५११०६