Tuesday, December 8, 2015

हरवले जे काही

सूर ते पुन्हा छेडेन मी..ताल तू माझा होशील का ??
जिंकेन मी जगाला, हारेन फक्त तुझ्याशी
ती हारच मज देई ,जिद्द जिंकायला जगाशी
हारशील कसा सांग तू..सोबत तुझ्या जीत आहे
एकदा फक्त खेळून बघ..खेळच तुझ्यासाठी आहे ..
जिंकणे हरणे ते राहिले कुठे आता .............
आता तर फक्त हरवणे एकमेकात
हरवले जे माझे कांही ..आज तू शोधून दे
कांही वाटले ओळखीचे..तुजकडेच ठेवून घे
झाली वेळ निरोपाची ,पाय आता निघू दे
अशीच पुन्हा मनासारखी..मैफिल लवकर सजू दे …
(Abhay Deshmukh,Arwind Chaudhari,Varsha Tai Chaughule यांच्या जुगलबंदीतून तयार झालेली "एक ओळ फक्त " या आमच्या समूहावरची कविता

No comments:

Post a Comment