वीज वेली
त्यांच्या रक्ताला पुनर्जन्म मिळू नये म्हणून
सोनामुठी मशालींचा चूड
त्यांच्या वस्त्या पेटवत गेला
जातांना मात्र मूठभर राख
स्वत:च्या 'पौरुषाची' खून म्हणून घेवून गेला
त्या वेळी ......
त्यांना माहित नसावं
हजारो अंकुर पोसण्याचे
राखेतले बळ
आज .......
त्या वस्त्या पुन्हा फुलारल्या आहेत
आणि आता मात्र...
त्यांच्या प्रत्येक घरासमोर रोपल्या आहेत "वीज वेली "
सोनामुठी मशालींचा चूड
त्यांच्या वस्त्या पेटवत गेला
जातांना मात्र मूठभर राख
स्वत:च्या 'पौरुषाची' खून म्हणून घेवून गेला
त्या वेळी ......
त्यांना माहित नसावं
हजारो अंकुर पोसण्याचे
राखेतले बळ
आज .......
त्या वस्त्या पुन्हा फुलारल्या आहेत
आणि आता मात्र...
त्यांच्या प्रत्येक घरासमोर रोपल्या आहेत "वीज वेली "
पेटत्या माशालींना शह देण्यासाठी !!
@राम मोरे/२६०७१९९०१४४०

No comments:
Post a Comment