Wednesday, December 30, 2015

मी तोच होतो



देव अनाथ जन्मला जेथे
ते गाव माझेच होते
भळभळून जन्मल्या जेथे यातना
ते घाव माझेच होते !!
कापून गाळे त्या गरीबांचे
ज्यांनी ते पोट भरले
रक्तात माखलेले
ते हात त्यांचेच होते !!
हजारोंची ज्यांनी पापे धुतली
ते हात माझेच होते
मग हातात खिळे ठोकणारे
ते हात कुणाचे होते ?
दुनियेत जे बदनाम झाले
ते नाव माझेच होते
शेंदूर फासून सोने झाले
ते देव कुणाचे होते ?
@राम मोरे /३००१२०११३१८१७

No comments:

Post a Comment