एक ओळ माझीही
Tuesday, December 8, 2015
जन्म
जन्म
दवात भिजता पानांना
फुलांची याद यावी
सांज किरण लोपता
स्वप्ने कवेत यावी
पाकळ्यांना अधीर मधुर
ओठांची याद यावी
मिलनात त्यांच्या नवी
कहाणी जन्म घ्यावी
स्पर्शात रेशमी तुझ्या
भावना ओथंबून यावी
मिठीत शब्दांना घेता
कविता जन्मास यावी
@राम मोरे/२१०६२०१२१०३६
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment